बातम्या

सांगलीतील पारेख बंधूंवर ईडीचा छापा

ED raid on Parekh brothers in Sangli


By nisha patil - 6/23/2023 4:14:07 PM
Share This News:



सांगलीतील दोन बड्या व्यावसायिकांच्या घरावर आज भल्या सकाळी ईडीने छापा टाकला. ईडीच्या दोन पथकातील सहा अधिकारी या दोन अलिशान बंगल्यातील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. तब्बल सहा तासांनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांची तपासणी सुरूच आहे.

सांगलीतील पारेख या व्यावसायिकांच्या दोन बंगल्यावर आज सकाळी सात वाजता ईडीने छापा मारला. या छाप्यात काय मिळाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील बाजूस असणाऱ्या या दोन अलिशान बंगल्यात ईडीची चौकशी सुरू आहे. बंगल्याबाहेर सीआरपीएफ चे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. या व्यावसायिकावर यापूर्वीही केंद्रीय पथकाचे छापे पडले होते. मात्र आज ईडीने छापा घालून चौकशी सुरू केल्याने शहरातील अनेक बड्या व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.


सांगलीतील पारेख बंधूंवर ईडीचा छापा