बातम्या
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी
By nisha patil - 9/1/2024 8:47:18 PM
Share This News:
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळपासून ईडीची रेड सुरू झाली. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनेकदा नोटीस धाडली होती. अशी माहिती तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी सकाळी सात वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्र मिळतात का? याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भ्रष्ट पद्धतीनं जोगेश्वरीतील खेळाचं मैदान ताब्यात घेऊन त्यावर तब्बल 500 कोटी रुपयांचं पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर केला होता. तसेच, यासंदर्भातील तक्रारही सोमय्यांनी केली होती.
भाजप नेते किरीट सोमय्यांचे आरोप नेमके काय?
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सप्टेंबरच्या महिन्यात रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी
|