बातम्या
युवा उद्योजक संकेत पाटील ची गरुडझेप
By nisha patil - 2/2/2024 11:01:15 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर :पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील बांधकाम व्यवसायात गेल्या चाळीस वर्षे सेवा कलेल्या सोपान डी पाटील यांचे चिरंजीव कु.संंकेत सोपान पाटील यांनी लहान वयातच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य,समाजहित, विविध प्रकारच्या स्पर्धा, खेळ,जिव्हाळा यात वाहून घेतले आहे. सध्या कोल्हापूर येथील उच्च्भ्रू भागात वास्तव्य करून ही त्यांनी गावाकडे नाळ जोडली आहे.
वडीलांच्या बांधकाम व्यवसायात लक्ष देत वडीलांसह संपूर्ण कुंटुबियांच्या मार्गदर्शनाखाली संकेत व्यवसायात कार्यरत असतो.वडीलांशी मित्रासारखी वागणूक ठेवून व्यवसायात मदत करतोय. वडिलांनी आपल्या मुलाचा कल नोकरीत नसून व्यवसाय करण्यात असल्याने त्याला एस.एस बुल्ट ऐसीसी ब्लाँक हा व्यवसाय सुरू करून दिला. संकेतने अतिशय सुंदर पध्दतीने या व्यवसायाची जबाबदारी स्वीकारून त्या व्यवसायासोबत ए.एस.के सेफ ग्लास हा नवीन व्यवसाय सुरु केला
पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देण्यासाठी सध्या त्याने वाटचाल सुरु केली असून सर्व कर्मचारी यांच्याशी त्याची जिवाभावाची वागणूक असून,कधीही कसलाही गर्व न करता नम्रता अंगी बाळगून तो आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभाळत आहे.
संकेतचा आवडता खेळ चारचाकी रेसिंग स्पर्धेत सहभागी होणे,
आज संकेतिचा वाढदिवस आहे तारा न्युजच्या वतीने संकेतला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या तरुण व्यावसायिक संकेत पाटील यांनी व्यवसायात गरुडझेप घेतली आहे.यासाठी आई,आजी,बहिणी, भाऊजी,आत्या आदींचे कायमच सहकार्य असल्याचे तारा न्युज शी बोलताना सांगितले.
युवा उद्योजक संकेत पाटील ची गरुडझेप
|