बातम्या

रोज सकाळी 4 भिजवलेले खजूर खा आणि हेल्दी राहा

Eat 4 soaked dates every morning and stay healthy


By nisha patil - 12/7/2023 7:14:56 AM
Share This News:



धकाधकीच्या आयुष्यात आज प्रत्येक जण नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महासंकटाने सगळ्यांना चिंतेत टाकलं आहे.

जर या धावत्या जगासोबत आपल्यालाही धावायचं असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात थोडे फार बदल करणे महत्त्वाचे आहे. अनेकांना माहिती असेल आम्ही पण तुम्हाला सांगितलं होतं की, काळा मनुका आणि बदाम  हे भिजवून खाल्ले तर आरोग्यास खूप फायदे होतात. पण तुम्हाला माहिती आहेत का? खजूर हे देखील भिजवून खाल्ल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होतो ते...हो खजूर देखील भिजवून खाल्ल्यास आरोग्यास अनेक फायदे  होतात. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर दिक्षा भावसार यांनी इन्स्टाग्रामवर भिजवलेले खजूर  खाण्याचे फायदे सांगितले आहेत. रात्री भिजवून ठेवलेले काळा मुनका, बदाम आणि खजूर सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी खाल्ल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. अनेकांना वाटतं की खजूर हे आपल्या शरीरासाठी गरम असतं. पण हा समज चुकीचा आहे. खजूर हे आपल्या शरीरासाठी अतिशय थंड आणि सुखदायक असतं. 
 

खजूर खाण्याचे फायदे 

खजूर केवळ खाण्यासाठीच स्वादिष्ट नसून आपल्याला अनेक फायदेही देतात.

1. बद्धकोष्ठतेची समस्या टळते.
2. हृदयाचे आरोग्य सुधारते.
3. निरोगी कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
4. हाडांचे आरोग्य सुधारते.
5. रक्तदाब नियंत्रित करते.
6. स्त्री आणि पुरुष दोघांची लैंगिक शक्ती वाढवते.
7. मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते .
8. थकवा दूर करते.
9. अशक्तपणा दूर करण्यासाठी फायदेशीर.
10. वजन वाढण्यास फायदा.
11. मूळव्याध प्रतिबंधित करते.
12. जळजळ प्रतिबंधित करते.
13. निरोगी गर्भधारणेसाठी फायदेशीर.
14. त्वचेसाठी आणि केसांसाठी सर्वोत्तम .


खाण्यासाठी सर्वोत्तम वेळ 

1. सकाळी रिकाम्या पोटी.
2. दुपारचे जेवण म्हणून.
3. मिठाई खावीशी वाटेल तेव्हा.
4. झोपताना तुपासह (वजन वाढवण्यासाठी).


किती प्रमाणात खाल्ले पाहिजे?

दोन खजूरने सुरुवात करावी. त्यानंतर रोज दिवसातून भिजवलेले 4 खजूर खावे.

भिजवून खाण्यामागे कारण? 

खजूर भिजवल्याने त्यातील टॅनिन्स/फायटिक ऍसिड निघून जातं ज्यामुळे आपल्याला त्यातील पोषकद्रव्ये सहज शोषून घेणे सोपे जातं. भिजवल्याने ते लहान होतात आणि पचायला सोपे जातात. त्यामुळे जर तुम्हाला खजूर चाखायचा असेल आणि त्यातून मिळणारे पोषणही शोषून घ्यायचे असेल, तर त्या खाण्यापूर्वी रात्रभर (8-10 तास) भिजवून ठेवा.


रोज सकाळी 4 भिजवलेले खजूर खा आणि हेल्दी राहा