बातम्या

मधात भिजलेले बदाम खा आणि रहा ‘निरोगी’

Eat almonds soaked in honey and stay 'healthy'


By nisha patil - 3/14/2024 7:06:16 AM
Share This News:



बदाम आणि मधाला आयुर्वेदात खूप महत्व आहे. हे दोन्ही पदार्थ आयुर्वेदात औषधी समजले जातात. बदाम आणि मधामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे त्याचे एकत्र सेवन खुपच लाभदायी आहे. यामध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात. अँटीऑक्सीडंट, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीएजिंग गुणधर्म असतात. १ महिना रोज मधात भिजलेले ३ बदाम खाल्ले तर अनेक फायदे होऊ शकतात.

मधामध्ये बदाम भिजत ठेवून नंतर खाता येतो. तसेच बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाल्ले तरी चालते.मध आणि बदामाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच ह्रदयही निरोगी राहते. मेंदूसाठी हे एक टॉनिक असून यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. एजिंगला थांबवते व त्वचा निरोगी ठेवते. यातील अँटीअ‍ॅलर्जिक आणि अँटीबॅक्टेरिअल गुणांमुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार दूर राहतात. प्रोटीनचा उत्तम सोर्स असल्यामुळे स्नायू मजबूत आणि सशक्त बनतात. यामुळे अशक्तपणा दूर होतो. तसेच केसांना मजबूत ठेवण्यासोबतच डोळ्याची शक्ती वाढते.


मधात भिजलेले बदाम खा आणि रहा ‘निरोगी’