बातम्या
सिमला मिरची खा आणि निरोगी रहा ! ‘हे’ आहेत ६ आरोग्यदायी फायदे
By nisha patil - 7/3/2024 7:40:23 AM
Share This News:
सिमला मिरची वापरून विविध पदार्थ तयार केले जातात. ही भाजी जवळपास सर्वच घरात खाल्ली जाते. परंतु, ती खाण्याचे प्रमाण मात्र खुप असल्याचे दिसून येते. सध्या आपल्याकडे चायनीज पदार्थांना चांगले दिवस आहेत. चायनीज पदार्थांमध्ये सिमला मिरची मोठ्याप्रमाणात वापरली जाते. परंतु, यामध्ये घातक पदार्थही वापरले जात असल्याने जास्त चायनिज पदार्थ खाणेही नुकसानदायक आहे. सिमला मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने शरीराला विविध आरोग्यदायी फायदे होतात. हे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१. त्वचेची आद्रता टिकून राहते. हाडे मजबूत होतात.
२. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. शरीरात कॅलरीचे प्रमाण वाढत नाही. कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.
३. शरीरातील वेदना कमी करते.
४. हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. हृदयाच्या शिरा बंद होत नाहीत.
५. पोटांचे विकार, अपचन, अॅसिडिटी किंवा गॅस यावर गुणकारी आहे.
६. कॅन्सरसारख्या रोगापासून शरीराचा बचाव होतो.
सिमला मिरची खा आणि निरोगी रहा ! ‘हे’ आहेत ६ आरोग्यदायी फायदे
|