बातम्या

नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा

Eat cardamom regularly for 10 days and lose weight


By nisha patil - 11/3/2024 7:35:57 AM
Share This News:



वेलचीचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. हिरवी वेलची तिच्या सुगंधामुळे गोड पदार्थांमध्ये नवा स्वाद आणते. अनेकजण तोंडाच्या शुद्धीसाठी वेलचीचा वापर करतात. मात्र फार कमी लोकांना माहीत आहे की वेलची केवळ स्वाद तसेच सुंगधासाठी नव्हे तर वेटलॉसमध्येही फायदेशीर आहे. जर तुम्ही वेलची दररोज खात असाल तर वजन घटवण्यात ते फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही जर नियमित १० दिवस वेलचीचे सेवन केले. तर तुमचं वजन लवकर कमी होऊ शकते.

असा करा वेलचीचा उपयोग –

१) तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अगोदर वेलचीची पूड करून घ्या. ही पूड एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी उठून ते पाणी प्या. असे जर तुम्ही नियमीत १० दिवस केले तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.२) काहीजणांना वेलचीचा चहा घ्यायला खूप आवडते. पण जर तुम्ही चहामध्ये वेलचीचा वापर करत आहात तर लक्षात ठेवा की चहामध्ये वेलचीचा वापर करू नका. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

३) तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही वेलची सालीसकट चघळा. यामुळे पचनशक्ती वाढेलच याशिवाय तोंडाची चव वाढेल तसेच शरीरामध्ये फायबर पोहोचेल. आणि तुमचं वजन कमी होण्यासही मदत होईल.


नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा