बातम्या

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा

Eat multi purpose spinach


By nisha patil - 3/25/2024 7:24:34 AM
Share This News:



पालकाची भाजी ही अनेक औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे. पालकामुळे विविध आजार आपल्या शरीराच्या आजूबाजूलाही येत नाहीत. लहान मुलांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींना आहारात पालकाची भाजी घेतली पाहिजे. आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही पालेभाजी नियमित सेवन केल्यास अनेक फायदे होतात. आरोग्यासाठी पालकाची भाजी किती गुणकारी आहे, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

पालकमध्ये फायबर असतात जे पचनक्रिया सुरळीत ठेवतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीराचे तापमान वाढत नाही. पालकमध्ये आयर्न जास्त असल्याने अनिमियासारखा आजार होत नाही. विशेष म्हणजे पालकची भाजी नियमित खाल्ल्यास महिलांचे मासिक पाळीचे चक्र सुरळीत होते. तसेच गरोदरपणात पालकाची भाजी खूपच फायदेशीर आहे. गर्भाचा योग्यरितीने विकास होण्यासाठी पालकाचं सेवन कराव जेणेकरून बाळाला निरोगी ठेवणारे सर्व न्यूटिएंट्स या पालकाच्या भाजीतून मिळतात. पालकातील व्हिटॅमिन के मेंदूचे कार्य सुरळीत राहते. पालकातील ल्युटेन आणि झेक्सानथिन अँटिऑक्सिडंट डोळ्यांना संरक्षण देते. त्याच बरोबर डोळ्यांच्या समस्या दूर होतात.


बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा