बातम्या

भेंडीची भाजी खा आणि आरोग्य जपा

Eat okra and stay healthy


By nisha patil - 3/15/2024 7:23:26 AM
Share This News:



भेंडीची भाजी अनकांना आवडते. शिवाय, प्रत्येक घरात ती बनवली जाते. परंतु, या भेंडीच्या भाजीचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत हे अनेकांना माहित नसते. भेंडीचे अनेक फायदे असून ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी भेंडी खाल्ल्यास काही दिवसांतच वजन कमी होऊ लागते. यासाठी भेंडीची भाजी कमी तेलात बनवली पाहिजे. गरोदर महिलांसाठी भेंडी खाणे फायदेशीर असते.

गरोदरपणात भेंडीची भाजी खाल्ल्यास गर्भपात होण्याची शक्यता कमी होते. ज्या महिलांच्या शरीरात फोलेटची कमतरता आहे.
त्यांच्यासाठी भेंडी खाणे लाभदायक आहे. गरोदर महिलांनी ही भाजी खाल्ल्यास बाळ मानसिकदृष्ट्या मजबूत होते आणि त्याची वाढही चांगली होते. भेंडीची भाजी खाल्ल्यामुळे पचनतंत्र सुधारते. भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठतेला आणि गॅसच्या समस्या कमी होतात. आतड्यांवर सूज असल्यास आराम मिळतो.

ज्यांना नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी आठवड्यातून दोनदा भेंडी खाल्ल्यास हा त्रास दूर होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठीही भेंडी गुणकारी आहे. भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. १०० ग्रॅम भेंडीमध्ये ३० किलो कॅलरी असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. भेंडी सांधेदुखीसारखे आजार, त्वचा चमकदार करण्यासाठी भेंडीची भाजी आवर्जून खावी. या आजारात खूप चांगला फरक दिसून येतो.


भेंडीची भाजी खा आणि आरोग्य जपा