बातम्या

अननस खा अन् वजन कमी करा! जाणून घ्या याचे फायदे.

Eat pineapple and lose weigh


By nisha patil - 11/7/2023 7:24:20 AM
Share This News:



अननसामध्ये मॅगनिजचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे अननस खाणाऱ्याच्या हाडांची मजबुती वाढते. दररोज एक ग्लास पाईनॅपल ज्युस पिणाऱ्यांचे दात आणि हिरड्या मजबूत होतात. पाईनॅपलमध्ये बिटा केरोटीनचे प्रमाण भरपूर असते.

त्यामुळे शरीराची झीज होण्याचा वेग कमी होतो. अननसाला बिटा केरोटीनचे पॉवर हाऊस म्हटले जाते. त्यात फायबरचे प्रमाण भरपूर असते आणि उष्मांक कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास पाईनॅपल उपयुक्त ठरते.

पाईनॅपल खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होतात. शरीराच्या सर्व अवयवांना जोम प्राप्त होतो. केस, त्वचा आणि नखे यांची झळाळी पाईनॅपलमुळे वाढते. अननसात ब आणि जास्त प्रमाणात क ही जीवनसत्त्वे असतात. पक्व फळे तशीच ताजी खातात. अननसापासून रस, मुरंबा, कडी, आसव व शिर्का तयार करतात.

अननस हे दिसायला काहीसे ओबड धोबड फळ आहे. ते बाहेरून कडक असले, तरी आतून मात्र रसरशीत असते. मात्र, नुसता खाण्याऐवजी अननसाचा ज्युस अधिकच पसंत केला जातो. अननसाचा वापर फ्रूट सॅलाडमध्येही मोठ्या प्रमाणावर करतात. अनेकदा अननसाच्या फोडींना साखर लावून त्याचे सेवन केले जाते. अननसाची फक्त चवच चांगली आहे असे नाही, तर ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. एक अननस अनेक आजार दूर करते.

अननसाचे काही गुण
इम्युनिटी वाढवते : अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एक तत्त्व असते. ज्यामध्ये अँटी-इनफ्लेमेटरी आणि फायब्रीनोलिटिक गुण असतो. अननस इम्यून सिस्टिम सुधारण्याचे काम करते. त्याचप्रमाणे अननसमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.

अननस आपल्या हाडांसाठी खूप चांगले असते ः यामध्ये मॅगनीज असते. मॅगनीज एक असे पोषकतत्त्व आहे जे हाडांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. याव्यतिरिक्त ब्रोमेलेनचे अँटी इन्फ्लेमटरी तत्त्व अर्थराइटिस सारख्या गंभीर समस्या दूर करण्याचे काम करते.
अननसामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्‍स आणि कॅलरी फार कमी असतात. त्यामुळेच डायबिटीजचे रुग्णही कसलीच काळजी न करता अननस हे फळ खाऊ शकतात. अननसमध्ये अशी काही अँटीऑक्‍सिडेंट्‌स असतात, जी फ्री रॅडिकल्सला दूर करून बॅड कोलेस्ट्रॉलचे ऑक्‍सिडेशन होण्यापासून वाचवतात. परिणामी हृदयरोगांची शक्‍यत कमी करतात. अननसमध्ये असलेले ब्रोमेलेन रक्तवाहिन्यांमधील रक्त जमा होणे आणि सूज येण्यापासून बचाव करते. यामुळे हृदयाच्या आजारांची शक्‍यता कमी होते.

अननस हा फायबरचा उत्तम स्रोत आहे. फायबरमुळे पचनक्रिया चांगली सुधारते. अननस खाणे आतड्यांना निरोगी ठेवते. यामध्ये उपलब्ध ब्रोमेलेन पोटाच्या ऍसिडला नियंत्रणात ठेवत असते. त्यामुळे ऍसिडिटी होत नाही.

अनेक स्टडीज्‌मध्ये समोर आले आहे की, अननस खाल्ल्याने कॅंसरची भीती दूर होऊ शकते. कारण यामध्ये कॅंसरपासून बचाव करणारे तत्त्व उपलब्ध असतात. एका संशोधनात सांगितले गेले की, अननसमध्ये उपलब्ध ब्रोमेलेन तुम्हाला कोलोरेक्‍टल कॅन्सरपासून वाचवते.


अननस खा अन् वजन कमी करा! जाणून घ्या याचे फायदे.