बातम्या

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी

Eat these 6 things to stay healthy and fit


By nisha patil - 7/12/2023 7:26:34 AM
Share This News:



उत्तम आरोग्य हे चांगल्या आहारावर अवलंबून असते. निरोगी राहण्यासाठी केवळ पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे पुरेसे नाही तर खाण्यापिण्याशी संबंधित काही महत्त्वाचे नियम पाळणेही आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते ज्याप्रमाणे अन्नपदार्थांमधून योग्य प्रमाणात पोषण मिळण्यासाठी योग्य गोष्टी योग्य वेळी खाणे आवश्यक आहे.

तसेच योग्य अन्नपदार्थ एकत्र करून खाणेही आवश्यक आहे. यामुळे शरीराला अधिक पोषण मिळते. कोणत्या गोष्टी एकत्र खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतात ते जाणून घेवूयात…

1. दही आणि केळे 
या दोन्ही गोष्टी शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांचे भांडार आहेत आणि दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतात. पण दोन्ही एकत्र खाल्ल्याने जास्त फायदा होऊ शकतो. व्यायामानंतर दही आणि केळीचे सेवन केल्यास स्नायू मजबूत होतात. हे अमिनो अ‍ॅसिड आणि ग्लुकोज सारखे कार्य करते, ज्यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात.

2. संत्री, टोमॅटो आणि बेरी 
या गोष्टी एकत्र खाल्ल्याने आयर्नच्या कमतरतेमुळे मेंदू आणि स्नायूंवर होणारा परिणाम दूर होते. मांसाहारी पदार्थांमधून लोह सहजपणे शोषून घ्यायचे असेल तर व्हिटॅमिन सी, संत्री, टोमॅटो आणि बेरी यासारख्या गोष्टींचे सेवन करू शकता.

 

3 ग्रीन टी आणि लेमन ज्यूस 
ग्रीन टी आणि लेमन ज्यूस ही दोन्ही अशी पेये आहेत ज्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीरात साचलेली घाण बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यामुळे इम्युनिटी वाढते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसारखे आजार होण्याची शक्यता खूपच कमी होते. या दोन्ही पदार्थांचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढते आणि पचनसंस्थाही चांगली राहते. 

4 अंडे आणि सलाड 
एका संशोधनानुसार, जे लोक तीन प्रकारच्या तळलेल्या अंड्यासह सॅलड खातात त्यांना लायकोपीन आणि बीटा-कॅरोटीन अँटीऑक्सिडंट्ससह अधिक कॅरोटीनॉइड्स मिळतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

5. पालक
केळी वजन कमी करण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी, बद्धकोष्ठता, अशक्तपणा, कावीळ, संधिवात आणि लघवीचे विकार यांसारखे आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहे.
याशिवाय केळ्यामध्ये फॅट नसते आणि एका केळीतून तुम्हाला सुमारे 90 कॅलरीज मिळतात.
फायबर असल्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. पालक हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे जो मानवी शरीराद्वारे सहजपणे अमिनो अ‍ॅसिडमध्ये सहजपणे विरघळतो.
हे प्रोटीन मसल्स वाढवण्यास मदत करते.

6. लिंबू आणि मध 

लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड नावाचा सक्रिय घटक असतो, जो सामान्यतः क्लिंजिंग एजंट म्हणून वापरला जातो.
कारण त्यात शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.
मधामध्ये रिबोफ्लेविन, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन बी 6 आणि डायेट्री फायबर असते.


हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी