बातम्या

ऑक्टोबरच्या थंडीत खा 'हे' आयुर्वेदिक पदार्थ, चुकूनही होणार नाही सर्दी!

Eat these Ayurvedic foods in the cold of October you will not get a cold by mistake


By nisha patil - 12/10/2023 7:19:09 AM
Share This News:




ऑक्टोबरच्या थंडीत खा 'हे' आयुर्वेदिक पदार्थ, चुकूनही होणार नाही सर्दी!
तूप आणि खोबरेल: तूप शरीराला गरम ठेवते. चांगल्या प्रतीचे तूप आणि खोबरेल तेल तुम्ही जेवणात वापरू शकता. थंडीत तुपाचे सेवन करणे आणि जेवणात सुद्धा तूप आणि नारळ तेलाचा वापर करणं हा एक उत्तम उपाय आहे.थंडीत सहाजिकच हात पाय खूप थंड पडतात. या ऋतूत खूप चहा प्यायची इच्छा होते . चहा बनवताना चहात १/४ तुकडा दालचिनी घाला आणि मस्त चहा बनवा. दालचिनीचा चहा हा उत्तम असतो. कफ दोष दूर करण्यासाठी, घसा शांत करण्यासाठी हा चहा उत्तम आहे.

मीठ, आलं, वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, लसूण, कांदा आणि ओरेगॅनो हे मसाले जेवणाचा स्वाद तर वाढवतातच पण या मसाल्यांचा वापर केल्यास जड अन्न देखील पचवलं जाऊ शकतं. थंडीत या मसाल्यांचा पुरेपूर वापर करावा.

जर तुम्हाला थंड जेवण खायची सवय असेल तर ऑक्टोबरच्या थंडीत तुम्ही अन्न गरम करून खायला हवं. थंडीत सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं शरीर गरम ठेवणं. लक्षात ठेवा तुम्ही कधीही काहीही खाल, ते जर गरम गरम असेल तर थंडीत त्याचा जास्त फायदा होईल.

काळी मिरी हा मसाला सर्दी आणि पचनावर उत्तम उपाय आहे. ऑक्टोबरच्या थंडीत काळी मिरी, हळद, दालचिनी हे मसाले वापरलेच पाहिजेत. हे मसाले आरोग्यासाठी खूप चांगले असतात आणि थंडीत तर यांचा वापर आवर्जून करावा.


ऑक्टोबरच्या थंडीत खा 'हे' आयुर्वेदिक पदार्थ, चुकूनही होणार नाही सर्दी!