बातम्या

ड्राय फ्रुट्समधील या चार गोष्टी प्रमाणात खा

Eat these four things in dry fruits in moderation


By nisha patil - 10/19/2023 7:19:05 AM
Share This News:




ड्रायफ्रूट्स
हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. डॉक्टर देखील प्रत्येकाला त्यांच्या आहारात ड्रायफ्रूटचा समावेश करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला फिट राहायचे असेल, प्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल, शरीरातील जीवनसत्वे, प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल तर ड्रायफ्रूट्स खाणे खूप गरजेचे असते.

त्यामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते. तज्ञांच्या सल्ल्यानुसार, प्रत्येकाने आपल्या आहारात चार ते पाच प्रकारच्या ड्रायफ्रूट्सचा समावेश करणे गरजेचे आहे.ड्रायफ्रूट्समध्ये काही असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी चार ते पाच प्रकारच्या ड्रायफ्रूटचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे.

ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी मानले जातात. कारण ड्रायफ्रूट्समध्ये आवश्यक ती पोषक तत्वे असतात जी आपल्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. त्यामुळे ड्रायफ्रूट्स खाणे खूप फायदेशीर ठरते.

ड्रायफ्रूट्समधील एक म्हणजे बदाम. बदामचा समावेश तुमच्या आहारात आवर्जून करा. बदाम हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बदाममध्ये विटॅमिन ई असते, जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसेच बदाम आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

काजू खायला बहुतेक लोकांना खूप आवडते. तर काजू हे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असते. काजू आपली शुगर नियंत्रणात आणण्यास मदत करते. तसेच काजूमध्ये फायबर, विटामिन, प्रोटीन जास्त प्रमाणात असते जे तुमचे वजन नियंत्रणात आणण्यास मदत करते. तसेच तुमच्या हृदयाचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत करते.

मनुके हे खायला खूप गोड असतात, तितकेच ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मणुक्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते जे आपल्या पोटाशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत करते. तसेच मनुके हे आपले पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.


ड्राय फ्रुट्समधील या चार गोष्टी प्रमाणात खा