बातम्या

कोथिंबिर खाल्याने शरीरातून निघतं बॅड कोलेस्ट्रॉल, तुम्हालाही माहीत नसेल भाज्यांचे हे फॅक्ट्स

Eating cilantro removes bad cholesterol from the body


By nisha patil - 5/1/2024 7:43:52 AM
Share This News:



घरातील मोठ्या लोकांना बघून आपणही अनेक गोष्टी करत असतो. पण अनेकदा त्या गोष्टी करण्यामागचे फायदे आपल्याला माहीत नसतात. भाजीत वरून कच्ची कोथिंबिर टाकणंही यातीलच एक. डॉ. रेखा यांच्यानुसार, ही गोष्ट आयुर्वेदात आधीपासून होती.

पण त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही.

आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रेखा राधामोनी यांनी सांगितलं की, भाज्या खाण्याची एक पद्धत आहे जी आरोग्यासाठी फार चांगली असते. भाज्या खाण्याआधी त्या चांगल्या स्टीम, ग्रिल्ड किंवा उकडून घ्याव्या. यासाठी काही हेल्दी गोष्टी आणि काही मसाल्यांचा वापर केला पाहिजे.

कोथिंबिरीचे फायदे

हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सूप किंवा भाजीत कोथिंबिरीची पाने टाकायला हवेत. ही पानं थंड असतात आणि हृदयासाठी फायदेशीर असतात.

कोहळा खाण्याचे फायदे

आयुर्वेदात कोहळ्याला शरीराला शांत आणि थंड करणारं मानलं आहे. याचं सेवन केल्याने त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. तेच वयोवृद्धांमधील सांधेदुखीही याने कमी होते. आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर याचं नियमित सेवन करा.

काकडी खाण्याची पद्धत

आयुर्वेदात कच्ची काकडी खाल्ल्याने पचन अग्नि कमी होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काकडी जेवणासोबत किंवा जेवल्यावर लगेच खाण्यास मनाई केली आहे.

तुरईचे फायदे

आयुर्वेदिक डॉक्टरांनुसार, तुरई किंवा दोडक्याची भाजी खाल्ल्याने आतड्यांची सफाई होते. इतकी सफाई दुसरी कोणतीही भाजी करत नाही. ही भाजी हट हेल्थसाठी फार फायदेशीर असते. सोबतच ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल ठेवण्यास मदत करते. डायबिटीसच्या रूग्णांनी याचं सेवन करावं.


कोथिंबिर खाल्याने शरीरातून निघतं बॅड कोलेस्ट्रॉल, तुम्हालाही माहीत नसेल भाज्यांचे हे फॅक्ट्स