बातम्या
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
By nisha patil - 2/3/2024 7:30:15 AM
Share This News:
गूळ खाल्ल्याने अनेक फायदे आहेत. मात्र, जास्त प्रमाणात कोणतीही चांगली गोष्ट खाल्ली तर त्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. अशाप्रकारेच गुळाचे अतिसेवन केल्यास अनेक समस्या होऊ शकतात. यासाठी चांगल्या दर्जाचा गुळ योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे. गुळाचे जास्त सेवन केल्याने होणारे नुकसान जाणून घेवूयात.
हे आहेत तोटे
१ कॅलरी, शुगर आणि कार्बोहायड्रेट्समुळे गूळ हा वजन वाढण्यास कारणीभूत ठरु शकतो.
२ जास्त प्रमाणात गूळ खाल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची भीती असते.
३ खराब गुळामुळे किटाणू शरीरात जाऊन इन्फेक्शनची भीती असते.
४ ताज्या गुळाचे सेवन केल्यास डायरिया होण्याची शक्यता अधिक असते. पोट दुखण्याची समस्याही होऊ शकते.
५ गरमीमध्ये जास्त खाल्ल्यास नाकातून रक्त येण्याची समस्या होऊ शकते.
६ सुक्रोज, ओमेगा ३ फॅटी अॅसिड कमी झाल्याने अनेक समस्या होऊ शकतात.
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
|