बातम्या

विड्याचे पान खाण्याचे असतात अनेक फायदे ; ‘हे’ आजार होतात दूर

Eating plantain leaves has many benefits


By nisha patil - 9/3/2024 7:23:36 AM
Share This News:



आपल्याकडे पूजाविधीमध्ये विड्याच्या पानाला खुप महत्व आहे. पूर्वी घरातील मोठी माणसं पान खात असल्याने घरोघरी विड्याची पाने हमखास असायची. परंतु, आता विड्याची पाने धार्मिक कार्याशिवाय घरात आणली जात नाहीत. पानशॉपमध्ये मात्र विड्याच्या पाने दिसतात. या विड्याच्या पानांना आयुर्वेदातही खुप महत्व आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून विविध आजारांवर विड्याची पाने उपयुक्त ठरतात. ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल बायोलॉजी’ने विड्याच्या पानातील औषधी गुणधर्मांबाबत संशोधन केले असून यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डोकेदुखीवर विड्याचे पान गुणकारी असून याच्या उपचाराने डोकेदुखीत लगेचच आराम मिळतो. डोकं दुखत असेल तर विड्याच्या पानांचा लेप कपाळावर लावावा. ३० मिनिटे हा लेप तसाच ठेवावा. त्यानंतर पाण्याने धुऊन टाका. हा उपाय केल्यानंतर डोकेदुखी ताबडतोब थांबते. शिवाय थंड वाटू लागते. विड्याच्या पानांमधील औषधी गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी २०१२मध्ये इंडियन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल बायोलॉजीने संशोधन केले. या संशोधनात आढळून आलेले निष्कर्ष थक्क करणारे आहेत. या संशोधकांना विड्याच्या पानात अशी तत्त्व आढळून आली जी ‘क्रॉनिक माइलॉइड ल्यूकेमिया’सोबत लढाण्यास उपयोगी ठरतात. यातील या गुणधर्मांमुळे ‘बोन मॅरो कॅन्सर’ बरा होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारण्यासाठीही विड्याचे पान गुणकारी आहे. ते पाचकासारखे काम करते. विड्याचे पान शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढवतो. शरीर मिनरल्स आणि पोषक द्रव्य घेऊ शकेल असे काम विड्याची पाने करतात. तसेच वजन कमी करण्यासाठीही ही पाने उपयोगी ठरतात. खोकला येत असल्यास विड्याच्या पानात हळद टाकून ते चावून खाल्ल्यास खोकला थांबतो. तसेच सूज आलेल्या ठिकाणी विड्याचे पान गरम करून बांधल्यास सूज उतरते. शिवाय विड्याचे पान खाल्ल्याने पोटातील जंतावरही आराम मिळतो. या पानांच्या सेवनाने तोंडाची दुर्गंधी निघून जाते. दररोज आंघोळीच्या पाण्यात विड्याची पाने टाकल्यास पाणी निर्जंतुक होते आणि शरीराला येणारी खाजही दूर होते. या पानाचा विडा खाताना कधीही तंबाखूचा वापर करू नये कारण तंबाखूमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे विड्यात तंबाखूचा वापर कधीही करू नये.


विड्याचे पान खाण्याचे असतात अनेक फायदे ; ‘हे’ आजार होतात दूर