बातम्या

ही पाने खाल्याने शरीरातील आयरनच्या पातळीला बसणार बुस्टर

Eating these leaves will boost the level of iron in the body


By nisha patil - 11/24/2023 7:17:29 AM
Share This News:




ओवा हा मसाला जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तसेच तो आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर ठरतो. मग गॅस, एसिडिटी झाली की ओवा खाल्ला जातो. ओव्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते.

पण तुम्हाला माहिती आहे का ओव्याची पाने ही आपल्या शरीरासाठी गुणकारी आहेत. ओव्याची पाने ही लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहेत. होय तुम्ही ऐकताय ते खरे आहे, ओव्याची हिरवी पाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला लोह मिळते. तसेच लोहासोबत आपल्या शरीराला फायबर, कॅल्शियम, जीवनसत्वे, प्रथिने हे देखील मिळते. ओव्याच्या पानांमुळे आपली पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

ओव्याच्या पानांचे शरीरासाठी फायदे

ओव्याची पाने ही आपले वजन नियंत्रणात आणण्यास मदत करतात. ओव्याच्या पानांमध्ये फायबरचे, कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ओव्याची पाने खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील चरबी नष्ट होण्यास मदत होते. तसेच ही पाने खाल्ल्यानंतर आपल्याला जास्त भूक लागत नाही. ओव्याची पाने खाल्ल्यानंतर आपलं पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे ओव्याचे पाने खाल्ल्यानंतर आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बहुतेक लोकांच्या शरीरात रक्ताची कमी असते. तर ओव्याची पाने ही आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करतात. रक्तासोबतच आपल्या शरीरातील आयरन वाढवायला देखील ओव्याची पाने मदत करतात. तसेच ओव्याच्या पानांमुळे ॲनिमियाच्या आजारापासून देखील आपली सुटका होते. त्यामुळे जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर ओव्याचे पाने जरूर खा.

बहुतेक लोकांना कॅविटीचा त्रास असतो. तर ज्यांना कॅविटीचा त्रास आहे त्यांनी ओव्याचे पाणी घ्या. तसेच ओव्याचे पाने खाल्ल्यानंतर दाढ दुखणे, दात दुखी किंवा हिरड्यांची दुखी कमी होण्यास मदत होते. तसेच तोंडात वास देखील येत नाही. ओव्याची पाने चावल्यानंतर तोंडातील बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होते.

सर्दी झाल्यानंतर ओव्याची पाने फायदेशीर ठरतात. ही पाने सर्दी, खोकला दूर करण्यास मदत करतात. सोबतच बहुतेक लोकांना कफ देखील होतो. तर कफाची ही समस्या देखील ओव्याची पाने दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्हाला कफची समस्या असेल तर ओव्याची पाने आवर्जून चावून खा यामुळे तुमचा कफ बाहेर पडण्यास मदत होईल.


ही पाने खाल्याने शरीरातील आयरनच्या पातळीला बसणार बुस्टर