बातम्या

आंबा पिकातून साधली आर्थिक प्रगती--आठवी पास शेतकऱ्याचा...

Economic progress achieved from mango crop 8th pass of the farmer


By nisha patil - 5/18/2024 4:18:48 PM
Share This News:



अलीकडच्या काळात अनेक शेतकरी  आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा  पाहणार आहोत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील नवीन कुमार राय  या शेतकऱ्याने आंबा पिकातून मोठं उत्पन्न घेतलं आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याचे शिक्षण फक्त 8 वी झालं आहे. तरीदेखील योग्य नियोजन करुन नवीन कुमार शर्मा यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे या आंब्याच्या झाडांची जास्त काळजी घेण्याची गरज नसते. फक्त वेळोवेळी खुरपणी आणि वेळोवेळी थोडेसे पाणी द्यावे लागते अशी माहिती नवीन राय यांनी दिली. मी आंब्याच्या बागेला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते वापरत नसल्याची माहिती राय यांनी दिली. त्यामुळं आंब्याचे फठ मोठे होते. तसेच फळातील गोडवा कायम राहत असल्याचे राय म्हणाले.


आंबा पिकातून साधली आर्थिक प्रगती--आठवी पास शेतकऱ्याचा...