बातम्या

‘शिक्षणशास्त्र’च्या डॉ. नगिना माळी यांना सर फौंडेशनचा इनोव्हेशन पुरस्कार

Education Dr Sir Foundation Innovation Award to Nagina Mali


By nisha patil - 3/30/2024 8:14:36 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. ३० मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातील शिक्षक डॉ. नगिना सुभाष माळी यांना सोलापूर येथील सर फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा इनोव्हेशन पुरस्कार जाहीर झाला आहे. मे २०२४मध्ये होणाऱ्या एज्युकेशनल इनोव्हेशन परिषदेत पुरस्कार वितरण होणार आहे.

सोलापूर येथील 'स्टेट इनोव्हेशन अॅन्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन)महाराष्ट्र या संस्थेतर्फे 'राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा-२०२३आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी डॉ. नगिना माळी यांनी प्रभावशाली अध्ययन-अध्यापन प्रतिमान: एक नाविन्यपूर्ण उपक्रम’ हा नवोपक्रम सादर केला. या नवोपक्रमाला 'सर फाऊंडेशन एज्युकेशनल इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड-२०२३पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण मे २०२४ मध्ये विशेष राष्ट्रीय एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्समध्ये करण्यात येणार आहे. परिषदेत विविध विषयांवर शैक्षणिक मंथन होणार आहे. शिक्षणतज्ज्ञांचे व्याख्यानपरिसंवादगटचर्चानाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरणपुरस्कार वितरण असे कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती फौंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे यांनी दिली आहे.

 

‘शिक्षणशास्त्र’च्या डॉ. नगिना माळी यांना सर फौंडेशनचा इनोव्हेशन पुरस्कार