बातम्या

शिक्षण हेच कर्म समाजसेवा हाच धर्म बाबासो नदाफ

Education is karma social service is religion Babaso Nadaf


By nisha patil - 9/30/2023 8:44:50 PM
Share This News:



शिक्षण हेच कर्म समाजसेवा हाच धर्म बाबासो  नदाफ

शिरढोण (संजय गायकवाड) /ता.३०  बहुजन समाजाला सन्मान मिळायचा असेल तर शिक्षणाची गंगा  बहुजनांच्या झोपडी पर्यंत पोहचली पाहिजे. शिक्षण हेच माणसाला सर्वांगीण बनवते.जगण्याची,लढण्याची ताकद देते. शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मानून आपले आयुष्य दुसऱ्यासाठी वाहिले असे प्रतिपादन बाबासाहेब नदाफ(राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय संघटक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य )यांनी केले
 

शिरढोण(ता.शिरोळ) येथील रमजानशेठ  बाणदार  विद्यालयात आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागाचे चेअरमन एम.बी.शेख होते.
 

 यावेळी अक्षय नेर्ले(युपीएससी, आयआरएस उत्तीर्ण ),बसवराज आजरी(इस्रो चंद्रयान मोहीम सदस्य), विद्यासागर आडगाणे, राजगोंडा पाटील,महेश दाते, एम.बी.शेख यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचा देखील विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, मुख्याध्यापक विजयकुमार पाटील यांनी स्वागत व  प्रास्ताविक केले.
   

यावेळी स्कूल कमिटी सदस्य सुनील बोरगावे,  राजू खोत, रणजीत पुजारी, पोलीस पाटील अनुराधा जाधव, अनिता मोरडे अण्णासो पानदारे, महावीर बोरगावे, अक्षय बोरगावे, सागर कोईक, तेजस्विनी पाटील, तमान्ना मोरडे, दिगंबर शिंदे बाबुराव मुंगळे, दिपाली भोसले, विकास चौगुले, शिवगोंडा पाटील, गितन  यादव आदी उपस्थित होते सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केली


शिक्षण हेच कर्म समाजसेवा हाच धर्म. बाबासो नदाफ