बातम्या
शिक्षणाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करावा- प्राचार्य विजय पाटील
By nisha patil - 3/19/2024 5:09:51 PM
Share This News:
पन्हाळा :प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करावा तसेच आपले स्वतःचे करिअर घडवण्यासाठी करावा व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सांस्कृतिकछ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए.भाग-३ च्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.विजयकुमार पाटील बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव शिवाजीराव पाटील होते.
कार्यक्रमास प्रमुखज उपस्थिती म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी.एन.रावण,ए ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस. कुरलीकर होते.यावेळी सानिका बोळावे,सानिका विभूते,सुकन्या पोवार,ऋतुजा पाटील,ओंकार चौगले,तेजसपेंडागळेकर,ज्योती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ.बी.एन.रावण,डॉ.एस.एस. कुरलीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.ए. आर.महाजन यांनी केले आभार डॉ.यु.यु.पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन आरती पाटील हिने केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
शिक्षणाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करावा- प्राचार्य विजय पाटील
|