बातम्या
बालसंस्कारातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य शिक्षण संस्थांनी करावे : राजेश क्षीरसागर
By nisha patil - 8/26/2024 3:48:48 PM
Share This News:
सद्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जगभरात आधुनिकतेने प्रगती केली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून घडणाऱ्या घटना क्षणभरात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या जात आहेत. या आधुनिकतेचा जसा चांगला वापर होतो त्याचपद्धतीने याचे दुष्परिणामही पहावयास मिळत आहेत. त्यामुळे आजच्या बालपिढीस बालसंस्काराद्वारे सुसंकृत करण्याचे कार्य शिक्षण संस्थांनी करावे, असे मार्गदर्शन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. दक्षिण ना उत्तर, विकासपर्व दक्षिणोत्तर या संकल्पनेतून राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने शालेय शिक्षण विभागाकडून फुलेवाडी येथील महानगरपालिकेच्या महात्मा फुले विद्यालयास रु.१ कोटी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज राजेश क्षीरसागर यांनी महात्मा फुले विद्यालयास भेट देवून मंजूर निधीतून होणाऱ्या प्रस्तावित कामांची माहिती घेतली. यावेळी मंजूर केलेल्या निधीबद्दल शाळा प्रशासनाकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे आभार मानत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, सद्याच्या घडीला काही शिक्षण सम्राटांच्या कडून शिक्षण क्षेत्राचे व्यावसायिकी करण्याचे काम सुरु आहे. परंतु, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवला आहे. यामुळे पालकांचाही ओघ याच शाळांकडे वाढल्याचे दिसत येत आहे हि बाब अंत्यत आनंददायी आहे.
बालसंस्कारातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य शिक्षण संस्थांनी करावे : राजेश क्षीरसागर
|