बातम्या

विवेकानंद कॉलेजच्या भूगोल विभागातील विद्यार्थ्यांची नागपूर व गोंदिया येथे शैक्षणिक भेट

Educational visit of Vivekananda College students of Geography Department to Nagpur and Gondia


By nisha patil - 1/13/2025 8:01:22 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजच्या  भूगोल विभागातील विद्यार्थ्यांची नागपूर व गोंदिया येथे शैक्षणिक भेट

भूगोल विभागातील  पी.जी.डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिकसच्या विद्यार्थ्यांची रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर (RRSC) - ISRO, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशनस सेंटर (MRSAC) नागपूर आणि नवेगाव व्याघ्र प्रकल्प (NNTR) गोंदिया येथे यशस्वी शैक्षणिक भेट  दिली.

विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील भूगोल विभागातील P. G. Diploma in Geoinformatics च्या विद्यार्थ्यांनी  दिनांक 8/1/2025 रोजी च्या ISRO sub center RRSC, नागपूर ला भेट दिली. विद्यार्थ्यांना General manager, RRSC डॉ.  श्रीनिवास यांनी "Applications of geospatial technology in natural resource management"  या विषयावरती व्याख्यान दिले तर डॉ. प्रकाशराव यांनी रिमोट सेन्सिंग व जीआयएस ची मूलभूत माहिती दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना

थ्री डी सॅटेलाईट लॅब. पहायला मिळाली.

दिनांक 9/1/ 2025 रोजी विद्यार्थ्यांनी MRSAC, नागपूर येथे भेट दिली.  या ठिकाणी डॉ. संजय आपतूरकर यांनी,  "रिमोट सेंसिंग आणि जीआयएस चा विविध क्षेत्रातील उपयोग" याची माहिती विदयार्थ्याना दिली.  दिवशी बाबा आमटे यांच्या अशोकवनला देखील भेट दिली.

दिनांक 10/1/2025 रोजी विद्यार्थ्यांनी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव व्याघ्र प्रकल्पाला  भेट दिली येथे श्री. पवन तिखिले यांनी Applications of GIS and REMOTE SENSING  in Tiger monitoring and wildlife habitat management"  याविषयी माहिती दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जंगल सफारी अनुभवली.  या सहलीचा विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोग होईल. 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे , संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, IQAC  समन्वयक डॉ. श्रृती जोशी, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भूगोल विभाग प्रमुख, डॉ.गोवर्धन उबाळे, डॉ. वैशाली पालकर  व डॉ.  विठ्ठल पाटील यांनी सहलीचे नियोजन केले होते. या सहलीस डॉ. शुभांगी काळे, डॉ. निशा सुर्वे आणि डॉ. सिद्धार्थ घोडराव , रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांचे सहकार्य मिळाले.


विवेकानंद कॉलेजच्या भूगोल विभागातील विद्यार्थ्यांची नागपूर व गोंदिया येथे शैक्षणिक भेट
Total Views: 38