बातम्या
प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो उपग्रह केंद्राला अभ्यासपूरक भेट
By nisha patil - 10/2/2024 11:49:08 PM
Share This News:
प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर च्या अटल लॅबमधील विद्यार्थ्यांनी 7 फेब्रुवारी 2024 रोजी बेंगलोर ISRO या ठिकाणी भेट दिली. अटल लॅब मध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल आणि डिजिटल लिटरसी या विषयांची माहिती त्यावरचे प्रोजेक्ट याचा अभ्यास असतो. या विषयाचा जास्तीत जास्त ज्ञान मिळावं. एखादा शास्त्रज्ञ यातून तयार व्हावा त्यांना ISRO मध्ये जाण्याची तिथे कामकरण्याची ओढ विद्यार्थी दशेतच निर्माण व्हावी त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, कुतूहल वाढावे , जिज्ञासुवृत्ती वाढावी यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी फक्त टीव्हीवर बघून वाचून माहीत होत्या त्या प्रत्यक्ष त्यांना बघायला मिळाल्यावर त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. बेंगलोर येथील इस्रो यु आर कॅम्पस मध्ये सुरक्षारक्षकांच्या सुरक्षितेत प्रवेश केल्यानंतर प्रथम नुकत्याच भारताने सोडलेल्या मंगळावरील चांद्रयानाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच या उपग्रह केंद्रातील प्रदर्शनामध्ये भारताने आतापर्यंत सोडलेल्या अवकाशातील विविध हे यानाचे रोल मॉडेल पाहायला मिळाली त्याचबरोबर या यानातील वेगवेगळे यंत्रसामुग्री त्याची कार्यपद्धती याची माहिती मिळाली
कोल्हापूर येथील सौ सुनीता कपूर राणे या इसरो मध्ये कार्यरत आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या उपग्रह केंद्रातील क्लीन रूम मधील प्रत्यक्ष चांद्रयान तयार करण्याची विविध पद्धती इलेक्ट्रॉनिक सर्किट्स कंप्यूटर टेक्नोलॉजी आणि त्यांची कार्यपद्धती याची प्रत्यक्ष माहिती मिळाली हा एक विलोभनीय अभ्यासपूर्ण असा क्षण होता या अभ्यास सहलीमध्ये शाळेतील एकूण 34 विद्यार्थी व 4 शिक्षकांचा सहभाग होता.
यामध्ये अटल इन्चार्ज सौ. पुरेकर मॅडम, सौ चव्हाण मॅडम, श्री बल्लाळ सर व श्री प्रशांत जाधव सर यांचा विशेष सहभाग होता. ही सहल यशस्वी करण्यास संस्थेचे व शाळेचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले आणि माननीय शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर साहेब व उपशिक्षणाधिकारी मोरे साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो उपग्रह केंद्राला अभ्यासपूरक भेट
|