शैक्षणिक
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची सातारा येथे शैक्षणिक भेट
By nisha patil - 11/2/2025 3:25:40 PM
Share This News:
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची सातारा येथे शैक्षणिक भेट
कोल्हापूर दि. ११ : विवेकानंद महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील बी.एस्सी. भाग-३ मधील विद्यार्थ्यांनी ‘शैक्षणिक क्षेत्रभेटी’ अंतर्गत इकोग्रीन अग्रोसायन्सेस प्रा. लि. व रुद्रनील इंडस्ट्रीज, सातारा येथे भेट दिली. ऑरगॅनिक व अनालॅटिकल केमिस्ट्री या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी औषध उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्पे प्रत्यक्ष पाहून समजावून घेतले. तसेच शेती औषधे निर्मिती विभाग आणि गुणवत्ता नियंत्रण व हमी विभागास भेट दिली. इंडस्ट्रीचे संचालक डॉ.रोहित कोळेकर यांनी प्रात्यक्षिकासहित प्रक्रियेची विस्तृत माहिती दिली.
या शैक्षणिक क्षेत्र भेटीचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. डी. शिर्के, एम.एस्सी. समन्वयक डॉ. ए.एस.कुंभार, प्रबंधक आर. बी. जोग, सहल समन्वयक प्रा. एस. एस. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ए. एन. अंभोरे व प्रा. डॉ. एस. एस. अंकुशराव यांनी यशस्वी केले. याप्रसंगी प्रा. एस. व्ही. जाधव, प्रा. आर. एस. तळेकर आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची सातारा येथे शैक्षणिक भेट
|