बातम्या
महापालिकेच्या सुविधा घेणाऱ्या सहा गावांपर्यंत हद्द वाढीसाठी प्रयत्न
By nisha patil - 8/7/2024 11:48:48 AM
Share This News:
कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ व्हावी, हे आपले मत आहे. यासंदर्भात अनेकवेळा बैठक झाल्या. हद्दवाढ करणार म्हटल्यावर त्या गावातील ग्रामस्थ मोर्चा काढतात, महापालिका सुविधा देत नाही, असे म्हणतातयामुळे महापालिकेकडून ज्या सुविधा कमी पडतात, त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जी सहा गावे महापालिकेच्या सुविधांचा लाभ घेतात त्या गावांचा लवकरच महापालिकेत समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिष्टमंडळाला दिली.
कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची भेट घडवून आणली जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे प्रश्न आहेत, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. खंडपीठ व कोल्हापूर शहर हद्दवाढ व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनुदान वाढ करा, या मागणीसंदर्भात रविवारी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शासकीय निवासस्थानावर भेट घेऊन चर्चा केली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर शहराची लोकसंख्या वाढल्याशिवाय सरकारच्या अनेक योजना शहरात राबवता येत नाहीत. त्यासाठी शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या सुविधा घेणाऱ्या सहा गावांपर्यंत हद्द वाढीसाठी प्रयत्न
|