बातम्या

फोर्ड कॉर्नर येथे झालेल्या मारहाणी प्रकरणी, आठ जणांना अटक.

Eight persons arrested in connection with assault at Ford Corner


By nisha patil - 10/7/2024 3:07:00 PM
Share This News:



कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी फॉर्ड कॉर्नर परिसरात सोमवारी रात्री तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.यामध्ये तरुणांच्या दोन गटात लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू असल्याचे आढळून आले.या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन्ही गटातील प्रत्येकी चार अशा एकूण आठ जणांना मंगळवारी अटक केली. यामध्ये सोमवार पेठ घिसाड गल्ली येथील अमोल रमेश पोवार, वैभव विनोद पोवार, सुजल अशोक पोवार, कुणाल प्रकाश पोवार, तर जवाहर नगरातील जावेद सिकंदर मुल्ला, सुलतान अस्करली सय्यद,आसिफ यासिन शेख, जुनेद जावेद शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दोन्ही गटातील तरुण केरली येथे वेगवेगळे मदयप्राशन करण्यासाठी गेले होते. जवाहर नगर मधील तरुणांनी अमोल पोवार याला शिवीगाळ केली. मदयधुंद अवस्थेत जवाहर नगरमधील तरुण रस्त्यावरील ये जा करणाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत होते. मात्र लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरला आल्यावर जास्त शिवीगाळ होऊ लागल्याने त्यांनी जवाहर नगर मधील तरुणांना अडवून चोप दिला. लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली. दरम्यान त्या परिसरातून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ शूट  केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तपोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आठ जणांना अटक केली.


फोर्ड कॉर्नर येथे झालेल्या मारहाणी प्रकरणी, आठ जणांना अटक.