खेळ
कोष्टी प्रीमिअर लीग चषकाचा एकलव्य वारीयर्स मानकरी
By nisha patil -
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी - येथील कोष्टी प्रीमिअर लीग आयोजित व हटकर कोष्टी समाज युवक मंडळाच्या सहकार्याने झालेल्या कोष्टी प्रीमिअर टर्फ क्रिकेट लीगच्या पहिल्या सत्राच्या चषकावर एकलव्य वारीयर्सने नाव कोरले. तर होगाडे वारीयर्सला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आमराई मळ्यातील मॅक मॅप द स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर दोन दिवस ही स्पर्धा प्रकाशझोतात पार पडली. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्रारंभी श्री बनशंकरी मातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. स्पर्धेचे उद्घाटन हटकर कोष्टी समाजाचे उपाध्यक्ष प्रभाकर उरणे, देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, चौंडेश्वरी सूतगिरणीचे माजी चेअरमन सुनिल सांगले, गणेश कोल्हापूरे, माजी उपनगराध्यक्ष रमेश कबाडे, युवक अध्यक्ष अमित खानाज, उपाध्यक्ष हेमंत वरुटे, दिनानाथ होगाडे, रामकृष्ण वाघिरे, शिवाजी रेडेकर, किशोर बोळाज, हेमंत आमणे, सुनिल गदाळे यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत कॅफेरॉन, जेआरडी वाघिरे वारीअर्स, टीम नरेंद्र, युफेरीया सिंगर्स, के. बी. ब्लास्टर्स, उरणे ब्रदर्स, एकलव्य वारीयर्स व होगाडे वारीअर्स अशा आठ संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात एकलव्य वारीअर्स व होगाडे वारीअर्स एकमेकांसमोर भिडले. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा वाढविणारा हा सामना ठरला. होगाडे वारीअर्सला अखेरच्या चेंडूवर ३ धावांची आवश्यकता असताना त्यांना रोखण्यात एकलव्य वारीअर्सच्या खेळाडूंना यश मिळाले. अखेर एकलव्य वारीअर्सने चषकावर नाव कोरले. समानावीराचा मान पंकज डंबाळ याला मिळाला. तर उत्कृष्ट फलंदाज अनिकेत बुचडे तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गजेंद्र धुत्तरगी हे मानकरी ठरले. पंच म्हणून ऋषभ फराकटे, वरद माळी यांनी काम पाहिले. समालोचन सुरेशकुमार पाटील यांनी केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योगपती विजय गलगले, युवा नेते जयेश बुगड, गौरव सांगले, कुणाल सांगले, हटकर कोष्टी समाज जिल्हाध्यक्ष इराण्णा सिंहासने, चिंतामणी पारीशवाड, प्रशांत गलगले, दीपक वस्त्रे, बनशंकरी ट्रस्टचे अध्यक्ष अमित कबाडे, महेंद्र उरणे, रोहन आलासे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी विनायक वरुटे, विजय गदाळे, विवेक हासबे, रजनीकांत लठ्ठे, आनंद हेब्बाळ, सचिन हळदे, श्रीशैल जेऊर, महेश वरुटे, अजय काकणकी आदींसह युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Eklavya Warriors won the Koshti Premier League Cupspeednewslive24#
|