बातम्या

एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना टोला म्हणाले...

Eknath Shinde told Uddhav Thackeray


By nisha patil - 3/21/2024 5:50:31 PM
Share This News:



मुंबई | बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सवंगडी मानायचे. पण उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी असल्यासारखे वागवायचे. पण इथून पुढे हे खपवून घेतले जाणार नाही. अब राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे  यांना प्रत्युत्तर दिले. ते गुरुवारी ठाण्यात शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार, मंत्री, आमदार आणि इतर नेते उपस्थित होते. या सगळ्यांसमोर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 
   

संकटकाळात कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभं राहा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका. शिवसैनिक फायरब्रँड आहे. मुख्यमंत्री 24 तास काम करतो. तुम्ही पण 24 तास काम करा, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी उपस्थित आमदार आणि खासदारांना दिला. आमदार म्हणून जेवढा लीड द्याल, ते तुमचं प्रगतीपुस्तक असेल. पुढचं तिकिट मिळेल की नाही हे त्यावरून ठरेल. आमदार, जिल्हाप्रमुखांची आणि पदाधिकाऱ्यांची ही खरी टेस्ट आहे, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. पक्षाची शिस्त कुणीही बिघडू नका, मी पण बिघडणार नाही. इथे राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. इथे कुणीही नोकर नाही, आपण सगळे मालक आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना सांगितले.


एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना टोला म्हणाले...