बातम्या

डॉल्बीच्या दणदणाटामुळे वयोवृद्धाचा मृत्यू

Elderly man dies due to Dolby sound


By nisha patil - 12/14/2023 3:52:26 PM
Share This News:



पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील गाडाईदेवीची यात्रा काल बुधवार पासून सुरू झाली.यामध्येबैलगाड्यांचा  मिरवणुकीत डाँल्बीचा दणदणाट मोठ्या प्रमाणात होता. या आवाजाने वयोवृद्ध बचाटे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना  दवाखान्यात नेत असताना गर्दीतून वेळ झाला. दवाखान्यात पेशंट पोहोचले पण आज सकाळी त्यांचां मृत्यू  झाला.
 

पन्हाळा पोलीसांच्या आशीर्वादाने पन्हाळा पश्चिमेला यात्रा ,लग्नसमारंभात डाँल्बीचा दणदणाट मोठ्या प्रमाणात असतो.याबाबत वारंवार  वयोवृद्ध लोकांनी तक्रारी केल्या पण काही उपयोग झाला नाही. यामुळे ही घटना घडली आहे.


डॉल्बीच्या दणदणाटामुळे वयोवृद्धाचा मृत्यू