गोकुळच्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची निवड

Election of Arun Dongle as Chairman of Gokul


By nisha patil - 5/25/2023 6:16:41 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या चेअरमनपदी दुसऱ्यांदा अरुण डोंगळे यांची निवड करण्यात आली. गोकुळचे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दोन वर्षांच्या मिळालेल्या कारकिर्दीत दूध संकलनाचा टप्पा 20 लाख लिटर आणि दूधउत्पादकांना दरवाढ देण्याचा संकल्प डोंगळे यांनी केला. 
अगदी ठरल्याप्रमाणे गोकुळ दूध संघाचे मावळते चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी 14 मे रोजी राजीनामा दिल्यानंतर  ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची आज चेअरमनपदी निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी डोंगळे यांना दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान महाडीक गटाची तीस वर्षाहून अधिक काळ असलेली सत्ता उत्सव गोकुळ मध्ये माजी मंत्री आमदार हसनमुश्री आणि सतीश पाटील यांनी सत्तांतर घडवून आणले होते. सत्ता हस्तगत केल्यानंतर चेअरमनपदी विश्वास पाटील आणि आता अरुण डोंगळे यांना संधी देण्यात आली आहे.


गोकुळच्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची निवडspeednewslive24#