बातम्या
कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतीपदी भारत पाटील- भुयेकर ,उपसभापतीपदी शंकर पाटील यांची निवड
By nisha patil - 5/25/2023 6:26:17 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे भारत पाटील भूयेकर यांची तर जनसुराज्य पक्षाचे शंकर पाटील यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना नूतन सभापती भरत पाटील यांनी कायदेशीर अभ्यास करून बेकायदेशीर नोकर भरती बाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांच्या उपस्थितीत सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली. सभापती पदासाठी भरत पाटील भोसेकर आणि उपसभापती पदासाठी शंकर पाटील या दोघांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. यानंतर मालगाव यांच्या हस्ते सभापती उपसभापती यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समितीतील सर्व सदस्य अभ्यासू आहेत शेतकऱ्यांशी निगडित बाजार समिती त्याने सर्व सदस्यांना विचारात घेऊनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत असा आवाहन यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी केलं. तर नूतन सभापती भारत पाटील यांनी कायदेशीर अभ्यास करून बेकायदेशीर नोकर भरती बाबत निर्णय घेणार आहे. आणि बाजार समितीचा कारभार हा मार्गदर्शक ठेवणार असल्याचं यावेळी सांगितलं. निवड जाहीर होताच नूतन सभापती आणि उपसभापतींच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून बाजार समिती परिसरात एकच जल्लोष केलाय.या निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्यासह समितीचे सर्व संचालक आम्हाला व्यापारी अडते शेतकरी उपस्थित होते.
कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतीपदी भारत पाटील- भुयेकर ,उपसभापतीपदी शंकर पाटील यांची निवडspeednewslive24#
|