बातम्या
भास्कर चौगले यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड
By nisha patil - 8/29/2023 7:51:50 PM
Share This News:
पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी माळवाडी येथील भास्कर दादासो चौगले याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असताना दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने हे यश संपादन केले आहे .
भास्कर चौगले याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत तालुका कृषी अधिकारी पदी यश संपादन केले. त्याचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर माळवाडी तसेच माध्यमिक शिक्षण डी. सी. नरके विद्यानिकेतन, कुडीत्रे येथे झाले होते. तसेच तो एस. एम. लोहिया कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याचे पदवीचे शिक्षण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण जूनागढ कृषि विद्यापीठ, जूनागढ (गुजरात) येथे पूर्ण झाले होते.
तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्यानंतर त्याने तरुणांसाठी बोलताना सांगितले की, या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी असल्याशिवाय आपण यश संपादन करू शकत नाही. त्याच्या या निवडीने कोतोली, माळवाडी पंचक्रोशीतून त्याचे अभिनंदन होत असून त्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भास्कर चौगले यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड
|