बातम्या
अखिल भारतीय मराठा महासंघ सहकार सेलच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी राजाराम नरके यांची निवड
By Administrator - 1/23/2025 7:01:10 PM
Share This News:
अखिल भारतीय मराठा महासंघ सहकार सेलच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी राजाराम नरके यांची निवड
पन्हाळा : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सहकार सेलच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी राजाराम पांडुरंग नरके (रा. केखले) यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र कोंढरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते नरके यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, महिला अध्यक्षा शैलजा भोसले, सहकार सेलचे जिल्हा अध्यक्ष सरदार पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, हातकणंगले तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष अवधूत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

राजाराम नरके यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल परिसरात अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघ सहकार सेलच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी राजाराम नरके यांची निवड
|