ताज्या बातम्या
राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध
By nisha patil - 2/27/2025 6:21:26 PM
Share This News:
राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध
बिनविरोध परंपरा कायम; समरजितसिंह घाटगेंची सहकारातील मुत्सद्देगीरी सिद्ध
कागल – पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी ही निवडणूक बिनविरोध करत सहकारातील आपली मुत्सद्देगीरी पुन्हा सिद्ध केली.
ही बँक १०८ वर्षांपूर्वी पतपेढी म्हणून स्थापन झाली असून, १९८६ मध्ये बँकेत रूपांतरित झाली. संस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिल्याने सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांत समाधान व्यक्त होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. समीर जांबोटकर यांनी १७ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली. निवडणुकीच्या या निकालानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सभासदांचा विश्वास आणि सहकारातील योगदान याबद्दल समरजितसिंह घाटगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
"राजे बँकेची सलग पाचवी निवडणूक बिनविरोध होणे हे स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या सहकारातून समृद्धीच्या शिकवणीचा गौरव आहे," असे त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित संचालक:
- सौ. नवोदिता समरजितसिंह घाटगे (शिंदेवाडी)
- मारुती पांडूरंग पाटील (बामणी)
- दत्तात्रय तुकाराम खराडे (शिंदेवाडी)
- संजय यशवंत पाटील (बेलवळे बुद्रुक)
- रविंद्र खंडेराव घोरपडे (माद्याळ)
- रणजीत शिवगोंडा पाटील (कागल)
- दीपक कुंडलिक मगर (कागल)
- सुशांत सुभाष कालेकर (कागल)
- संजय गुरुदास चौगुले (हमीदवाडा)
- प्रकाश कृष्णाजी पाटील (करड्याळ)
- अमर धोंडीराम चौगुले (मुरगूड)
- अमोल मलगोंडा शिवई (सुळकूड)
- प्रविण आण्णासो कु-हाडे-वड्ड (कागल)
- नम्रता विवेक कुलकर्णी (कागल)
- उमेश आनंदा सावंत (कागल)
- अरुण अशोक गुरव (कागल)
- राघू यशवंत हजारे (सिद्धनेर्ली)
बँक एक हजार कोटींच्या वार्षिक उलाढालीच्या दिशेने वाटचाल करत असून भविष्यात अधिक पारदर्शक व विश्वासार्ह सेवा देण्याचा संकल्प संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध
|