बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या...

Elections of local selfgovernment bodies have been suspended


By nisha patil - 1/28/2025 7:20:23 PM
Share This News:



 राज्य सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मात्र, पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलली गेली असून न्यायालयाने पुढील तारीख 25 फेब्रुवारी निश्चित केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांना थेट स्थगिती दिलेली नसली तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने निवडणुकांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. याचिकाकर्त्यांकडून ओबीसी आरक्षण असो किंवा नसो, निवडणुका वेळेत व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात सध्या 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद, आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष या निकालाकडे आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून लवकर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.


शिवसेनेसह इतर पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, निवडणुकांसाठी अद्याप सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागणार आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या...
Total Views: 42