बातम्या

इचलकरंजीत कार्यशाळेतून विद्युत सुरक्षेचा जागर

Electrical safety awareness from Ichalkaranjit workshop


By nisha patil - 3/7/2024 6:24:02 PM
Share This News:



कोल्हापूर : विद्युत निरीक्षक कार्यालय, महावितरण व इचलकरंजी इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने दि.2 जुलै रोजी महावितरणच्या इचलकरंजी कार्यालयात विद्युत सुरक्षा कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेतून विद्युत सुरक्षेचा जागर करण्यात आला.

सदर कार्यशाळेस महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, सहाय्यक विद्युत निरीक्षक श्री. प्रभाकर पतंगे, आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे राहुल मगदूम, इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाहू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत अधिकारी-कर्मचारी, जनमित्र, बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. सर्वांनी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली.

कार्यशाळेत विद्युत सुरक्षा व उपययोजना या संबंधी माहिती देणारी चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. विद्युत अपघात कसे होतात, विद्युत उपकरणे कशी हाताळावीत व विद्युत अपघात होऊ नये यासाठी कोणती दक्षता घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. वृक्षप्रेमी राहुल मगदूम यांनी पर्यावरण संवर्धन व वृक्ष सुरक्षा या विषयी मागर्दर्शन केले. कार्यशाळेचे संचलन विजय कोठावळे व सौ.निकिता नाईक यांनी केले.


इचलकरंजीत कार्यशाळेतून विद्युत सुरक्षेचा जागर