बातम्या
कोल्हापूर परिमंडलात 34 कोटी 59 लाखांची वीजबिल थकबाकी
By nisha patil - 3/27/2025 4:40:21 PM
Share This News:
कोल्हापूर परिमंडलात 34 कोटी 59 लाखांची वीजबिल थकबाकी
ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – महावितरण
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 71,281 वीजग्राहकांकडे एकूण 34 कोटी 59 लाख रुपयांची थकबाकी असून, थकबाकीदारांनी वेळेत वीजबिल भरावे, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.
थकीत रक्कम गृह, व्यावसायिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा गटांमध्ये विभागली असून, गेल्या तीन महिन्यांत 3,537 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
वीजबिल भरण्यासाठी अधिकृत केंद्रे 29, 30 व 31 तारखेला सुरू राहणार आहेत. ग्राहक www.mahadiscom.in व महावितरण अॅपद्वारेही ऑनलाइन बिल भरू शकतात. डिजिटल पेमेंटवर 0.25% सवलत तसेच 5,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बिलांसाठी आरटीजीएस व एनईएफटी सुविधा उपलब्ध आहे.
कोल्हापूर परिमंडलात 34 कोटी 59 लाखांची वीजबिल थकबाकी
|