बातम्या

विवेकानंद मार्फत इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जागरूकता अभियान संपन्न

Electronic commerce awareness campaign completed through Vivekananda


By nisha patil - 4/27/2024 6:39:16 PM
Share This News:



 विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर  अधिकारप्रदत्त स्वायत्त मधील वाणिज्य विभागामार्फत  १९ मार्च २०२४ ते २५ एप्रिल २०२४ या कालावधीत इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जागरूकता अभियान राबविण्यात आले. या मध्ये सध्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉमर्स अंतर्गत येणाऱ्या विभिन्न गोष्टीमुळे सर्व सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे या संदर्भात परिपत्रका मार्फत बी. कॉम भाग-२ व  बी. कॉम भाग-३ च्या विध्यार्थ्यानी  जनजागृती केली. यामध्ये ATM/ Debit / Credit Card वापरताना कोणती दक्षता घ्यावी,  मोबाईल बँकिंग व  इंटरनेट बँकिंग वापरताना कोणती दक्षता घ्यावी,  सोशल मिडियाचा वापर व सायबर गुन्हेगारीबद्दल घ्यावयाची काळजी  तसेच नागरिकांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास आपली तक्रार कोठे नोंदवावी या विषयी सविस्तर माहिती या अभियाना अंतर्गत देण्यात आली. 

सदर अभियान कोल्हापूर शहर व कोल्हापूर जिल्ह्यतील ५६ गावातील १३०० पेक्षा जास्त कुटुंबामध्ये जनजागृती केली. या अभियानाचे समन्वयक म्हणून डॉ. उमेश दबडे यांनी काम पहिले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व आय. क्यू . ए. सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांचे मार्गदर्शन लाभले व वाणिज्य  विभाग प्रमुख प्रा. सनी काळे, डॉ. अमोल मोहिते, डॉ. योगेश माने यांचे सहकार्य लाभले.


विवेकानंद मार्फत इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जागरूकता अभियान संपन्न