विशेष बातम्या
राज्यातील ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविणार....
By nisha patil - 11/2/2025 3:16:58 PM
Share This News:
राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने १० फेब्रुवारीपासून राज्यातील ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या राष्ट्रीयस्तरावर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नाम.जे.पी.नड्डाजी यांच्या हस्ते करण्यात आलंय. राज्यातील पाच जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाम.जे.पी.नड्डाजी यांनी केलंय.
ना. प्रकाश आबिटकर म्हणाले की, राज्यातील पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा व चंद्रपुर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या असून त्यापैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधांचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०२७ पर्यंत या आजाराचे देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे.
राज्यातील ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविणार....
|