बातम्या
अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये .
By nisha patil - 2/27/2025 6:14:51 PM
Share This News:
अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये .
राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे यांच्या सूचना.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी, आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली नियतन, उचल व वाटप, अन्न वितरण प्रणाली बाबतच्या तक्रारी, पोषण या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आढावा घेतला.
या बैठकीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी करीत असताना कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर, सर्व तालुक्यांचे पुरवठा निरिक्षक, सीडीपीओ, शालेय पोषण आहाराचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्या त्या विषयाची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण यांनी सादर केली. ते कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन अन्नधान्य वितरण व्यवस्था आणि पोषण आहाराचे व्यवस्थापन पाहणी करणार आहेत.
अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये .
|