बातम्या
विश्वकर्मा योजनेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लोकांना लाभ द्या : विजय जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By nisha patil - 9/4/2025 8:42:35 PM
Share This News:
विश्वकर्मा योजनेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लोकांना लाभ द्या : विजय जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतील अंमलबजावणीत असलेल्या त्रुटींमुळे अनेक लाभार्थींची प्रकरणे प्रलंबित आहेत. यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.योजनेंतर्गत नाव नोंदणी, प्रशिक्षण व अनुदान मिळण्यात अनेक अडचणी असून, त्याबद्दल नागरिकांनी थेट तक्रारी मांडल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व त्रुटी दूर करून नागरिकांना लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून, पुढील आठवड्यात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे संकेत दिले.या वेळी डॉ. आनंद गुरव, सौ. सुशीला पाटील, अर्जुन सुतार, महेश यादव, विराज चिखलीकर आदींसह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
विश्वकर्मा योजनेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लोकांना लाभ द्या : विजय जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
|