बातम्या
रेशनधान्य दुकानदार यांच्या अडचणी दूर करा
By nisha patil - 12/13/2023 3:43:15 PM
Share This News:
रेशनधान्य दुकानदार यांच्या अडचणी दूर करा
जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे रेशनधान्य दुकानदार याचे निवेदन
epos मशिन मधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात
मे २०२१ धान्य वाटपाचे कमिशन मिळावे
रेशनधान्य दुकानदार महासंघ, कोल्हापूर यांचे वतीने विविध मागण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे अडचणी दूर करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले रेशनधान्य दुकानदार महासंघ, कोल्हापूर यांचे वतीने विविध मागण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे अडचणी दूर करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने मे २०२१ धान्य वाटपाचे कमिशन मिळावे, डिसेंबर २०२२ मध्ये रेशन धान्य दुकानदारांनी पैसे भरले पण केंद्र सरकारने जानेवारी २०२३ पासून (PMGKY) मोफत धान्य योजना सुरु केली त्यावेळी जे दुकानदारांनी पैसे भरले आहेत ते पैसे त्यांना परत मिळावेत.
epos मशिन मधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात.,ऑनलाईन रेशन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ऑपरेटर नेमणूक व्हावी,रेशन धान्य दुकान दाराला ठोस मानधन मिळावे.,कमिशनमध्ये वाढ व्हावी व स्टेशनरी खर्च मिळावा.अशा मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण याना देण्यात आले
यावेळी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष डाॅ. रवींद्र मोरे, उपाध्यक्ष आबू बारगीर, गजानन हवालदार, हातकलंगले अध्यक्ष श्रीपती पाटील, कागल अध्यक्ष संदीप लाटकर, कागल सचिव साताप्पा शेणवी, राहुल शिराळे, दीपक शिराळे, बाबासो पाटील भुयेकर, इचलकरंजी अध्यक्ष पांडुरंग सुभेदार, राजन पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते
रेशनधान्य दुकानदार यांच्या अडचणी दूर करा
|