बातम्या
विवेकानंद ज्युनिअर कॉलेज मध्ये हिंदी दिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा संपन्न
By nisha patil - 9/25/2024 8:06:20 PM
Share This News:
दि.14 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत हिंदी दिन पखवाडा विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे साजरा करताना त्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षिका तथा आर्टस / कॉमर्स विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद कॉलेज सिनीअर विभाग हिंदीचे प्रमुख डॉ. आरिफ महात आणि मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयेाजन प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.त्याचबरोबर ज्युनिअर आर्टस / कॉमर्स चे स्टाफ सेक्रेटरी तथा ज्युनिअर हिंदी विभाग प्रमुख प्रा. श्री. विश्वंभर कुलकर्णी, ज्युनिअर सायन्स हिंदीचे प्रा. श्री. लक्ष्मण नाकाडी, प्रा.सौ. सविता वेदांते, प्रा. सौ. आश्विनी गायकवाड, प्रा.श्री. पठाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. श्री विश्वंभर कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकातून हिंदी दिनाचे महत्व आणि हा दिवस का संपन्न केला जातो, याबद्दल थोडक्यात सांगितले. तसेच आयोजित वक्तृत्व स्पर्धेबद्दल सुध्दा माहिती दिली.
प्रमुख अतिथी मनोगतामध्ये डॉ. आरिफ महात म्हणाले, जिथे भाषा वर जोर दिला जातो तेथे भाषेचा अंत होतो आणि जिथे भाषेला आपलेसे करुन हिंदी भाषेत अन्य भाषांनाही महत्व दिले जाते तेथे भाषा जिवंत राहते, असे सांगत आजच्या युगात हिंदी ला किती महत्व आहे आणि हिंदी का आवश्यक आहे याबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. डॉ. प्रदीप पाटील यांनी भाषा चे चार प्राथमिक कौशल्य यांची माहिती देत सांगितले की, आपल्या आयुष्यात ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहीणे का आवश्यक आहे याबद्दल माहिती सांगितली. जर आपण आपल्या जीवनात हे चार कौशल्य अंगीकारले तर जीवनात यशाची शिखरे गाठताना कोणतीही अडचण येणार नाही.
अध्यक्षीय भाषणात प्रा.सौ. शिल्पा भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत हिंदी आपली राजभाषा आहे तिचा सम्मान अवश्य करा परंतु सोबतच अन्य भाषा ज्या आहेत त्यांचाही सम्मान होणे गरजेचे आहे असे सांगितले. जसे चित्रपटांमध्ये हिंदी भाषा जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही आणि म्हणूनच हिंदी भाषेवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी शब्द भांडार वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले. आणि यासाठीच वर्षातून कमीतकमी एकदा तरी हिंदी भाषिक एक तरी पुस्तक वाचणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा. वेदांते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेचे नियम समजावून सांगितले. ज्युनिअरकॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धा परीक्षण डॉ. आरिफ महात आणि डॉ. प्रदीप पाटील यांनी केले.
• वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक :- 1. प्रणव सुरेश सांभारे 12 सायन्स
व्दितीय क्रमांक :- 2. करण संजय पाटील 12 वी आर्टस
तृतीय क्रमांक :- 3. प्रांजली मनीष निंबाळकर 11 वी सायन्स
विवेकानंद ज्युनिअर कॉलेज मध्ये हिंदी दिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा संपन्न
|