बातम्या

ममता बॅनर्जींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, खराब हवामानाचा फटका

Emergency landing of Mamata Banerjees helicopter hit by bad weather


By nisha patil - 6/27/2023 4:51:04 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  खराब हवामानामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उत्तर बंगालमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मान्सूनचे सध्या देशात अनेक ठिकाणी जोरदार आगमन झाले आहे. ममता बॅनर्जी या हेलिकॉप्टरने प्रवास करत असताना मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टरचे उत्तर बंगालच्या सलुगारा येथील लष्कराच्या हवाई तळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

ममता या पंचायत बैठकीनंतर बागडोगराहून जलपाईगुडीला जात होते. दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यामुळे आता त्या पुढील प्रवास रस्त्याने करणार आहेत. ममता बॅनर्जी आज दुपारी कोलकात्याला परतणार आहेत.


ममता बॅनर्जींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, खराब हवामानाचा फटका