बातम्या
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांनी 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By nisha patil - 5/18/2024 4:20:21 PM
Share This News:
नारायण वाघुल यांना 2009 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं. नारायणन वाघुल यांना आयसीआयसीआय बँकेतील अनेक मोठ्या बदलांचे श्रेय जाते. 1985 मध्ये त्यांनी ICICI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. आयसीआयसीआय बँकेला सार्वजनिक वित्तीय संस्थेतून देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांच्या यादीत नेण्यासाठी वाघुल यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नातून ICICI ला 1994 मध्ये बँकेचा दर्जा मिळाला. सन 1996 मध्ये ते आयसीआयसीआय बोर्डमधून बाजूला झाले आणि 2009 पर्यंत ते गैर-कार्यकारी अध्यक्षपदावर राहिले.
केंद्र सरकारने वाघुल यांना 2009 साली व्यापार आणि उद्योग श्रेणीतील देशातील तिसरा सर्वोच्च
नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले. वाघुल हे बँक ऑफ इंडियाचे सर्वात तरुण अध्यक्षही होते. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांना BOI चे अध्यक्ष बनवण्यात आले.
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांनी 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
|