बातम्या

भविष्यातील चिंतेमुळे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Engineering student commits suicide due to worry about future


By nisha patil - 2/19/2024 3:30:51 PM
Share This News:



भविष्यातील चिंतेमुळे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कोल्हापूर : अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यानं फरशी कापण्याच्या ग्राईंड मशीनच्या साहाय्यानं गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. नीरज विकास सरगडे (वय २३, रा. सुधाकरनगर) असं त्या विद्यार्थ्याचं नाव असून आर्थिक परिस्थितीमूळं ग्रासलेल्या भविष्यातील चिंतेमुळं त्यानं आत्महत्या केल्याचं चिठीत लिहिलं आहे.

नीरज आईसह आपल्या आजोळी सुधाकरनगर इथल्या बागेश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता. अभियांत्रिकी डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात तो शिक्षण घेत होता. आर्थिक समस्येमुळे शिक्षणासाठी, लग्नासाठी लागणारी रक्कम, मुलाबाळांचा खर्च अशा भविष्यातील खर्चाची तरतूद आपण करू शकणार नाही, या चिंतेनं तो ग्रासला होता. 

रविवारी त्याची आई कऱ्हाड ला गेली होती. दुपारी तो कॉलेजवरून घरी आला आणि दार लावून घेऊन फरशी कापण्याच्या ग्राईंडर मशीनच्या साहाय्यानं त्यानं स्वतःचा गळा कापून घेतला. आत्महत्ये नंतर बाजूला पडलेल्या ग्राईंडर मशीनच्या कर्कश आवाजाने अपार्टमेंटमधील रहिवाशांनी फ्लॅटकडे धाव घेतली. यावेळी फ्लॅट बंद अवस्थेत आढळला. त्यानंतर हाका मारूनही कोणी दार उघडत नसल्यानं रहिवाशांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मागच्या बाजूने जाऊन फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता नीरज बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. मृतदेहाजवळ इंग्रजीत लिहिलेली सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये आत्महत्या करण्यामागचे कारण लिहिले होते.


भविष्यातील चिंतेमुळे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या