बातम्या

प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी

Enhance beauty with ancient remedies used for years


By nisha patil - 11/3/2024 7:33:36 AM
Share This News:



 

सौंदर्यवृद्धीसाठी प्राचीन काळापासून अनेक नैसर्गिक उपाय केले जात आहेत. आजही हे उपाय प्रभावी मानले जातात. केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी हे नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आहेत. शिवाय, कमी खर्चात हे सौंदर्य उपाय करता येत असल्याने कुणीही ते करू शकतात. सौंदर्य वाढविण्यासाठी असलेल्या आयुर्वेदातील अशा दहा पदार्थांची माहिती आपण घेणार आहोत.

हे आहेत ते पदार्थ

१) बदामआयुर्वेदात याचा वापर रंग उजळण्यासाठी केला जातो. यामुळे चेहरा उजळतो, डाग दूर होतात.


२) केशरयाच्या वापराने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. तत्वचेची चमक वाढते.

३) लिंबू
रंग उजळतो, त्वचा आणि केसांची चमक वाढते.

४) काकडीयाच्या वापराने त्वचेचा ओलावा टिकतो. सुरकुत्या दूर होतात. वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही.

५) दहीयामुळे केसांची चमक वाढते. त्वचेचा रंग उजळतो.

६)आवळाआयुर्वेदानुसार केसगळती, कोंडा अशा केसांच्या कोणत्याही समस्या आवळा लावल्याने दूर होतात. यामुळे केस सशक्त राहतात.

७) तुळसहे त्वचेवर लावल्याने पिंपल्स ठीक होतात. त्वचेवर असणारे अतिरिक्त तेलही निघून जाते.

८) हळदयामुळे रंग गोरा होतोत. काळसरपणा दूर होतो.

९) अ‍ॅलोवेरापिंपल्स, पुरळ, त्वचारोग दूर होतात.

१०) दूधकच्चे दूध लावल्याने चेहरा उजळतो, केस निरोगी होतात.


प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी