विशेष बातम्या
एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहणार नाही, याची खबरदारी घ्या:-श्री. राजेश क्षीरसागर.
By nisha patil - 2/6/2023 4:04:10 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत च्या बैठकीत चालू वर्षाच्या ॲडमिशन प्रक्रिये बाबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीच्या सुरुवातीस शिक्षण उपसंचालक उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून राजेश क्षीरसागर यांनी गेली 14 वर्षे युवा सेनेच्या माध्यमातून ॲडमिशन प्रक्रिया संदर्भात मोर्चा काढला जातो, बैठक घेतली जाते,विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो,
तरी देखील चालू वर्षी पुन्हा तेच प्रश्न, संस्थाचालकांची तीच मजोरीवर या गोष्टी विद्यार्थी हिताला मारक असून जिल्ह्यातील कुठलाही विद्यार्थी ॲडमिशन पासून वंचित राहिला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी, तसेच शिक्षण संस्थांकडून विविध डोनेशनच्या माध्यमातून होत असलेली लूट थांबवावी, तसेच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, यासह अन्य सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच शिक्षण संस्था प्रतिनिधी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संबंधित अधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांची व्यापक बैठक येत्या 9 जून रोजी घेण्याच्या सूचना राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चेतन शिंदे यांनी शिक्षण संस्थांमधील भ्रष्ट कारभाराविषयी भाष्य करून, विद्यार्थी हिताच्या आड येणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना योग्य समज देण्यात यावा, आणि तरीही न ऐकल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात घ्यावी, ही सूचना केली. तसेच कोणतीही शिक्षण संस्था ॲडमिशन प्रक्रियेत आडवणूक करत असेल तरी युवा सेनेची
संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावेळी युवा सेनेचे शहर प्रमुख मंदार पाटील यांनी, शिक्षण संस्थांकडून आकारण्यात येणाऱ्या ट्रान्सपोर्टेशन पी, इमारत फंड, तसेच इतर लुटी बाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली.
सदर बैठकीस सहाय्यक संचालक सुभाष चौगले, प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे, महापालिका प्रशासन अधिकारी यादव, युवा सेना संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, युवा सेना जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे, महानगर संघटक अक्षय कुंभार,युवा सेना शहर प्रमुख पियुष चव्हाण, शहर सरचिटणीस विपुल भंडारे, युवती सेनेच्या नम्रता भोसले, आयटी सेनेचे शहर प्रमुख सौरभ कुलकर्णी, आदि सह उपसंचालक कार्यालयातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहणार नाही, याची खबरदारी घ्या:-श्री. राजेश क्षीरसागर.
|