बातम्या

शहाजी महाविद्यालयात पर्यावरण पूरक दसरा संपन्न

Environment complementary Dussehra completed in Shahaji College


By nisha patil - 10/21/2023 1:27:24 PM
Share This News:



 कोल्हापूर:  दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात पर्यावरण पूरक दसरा साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. 


     

महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी जंगलातील विविध झाडांच्या बियांचे घट बसवून या घटामध्ये बीया रुजवल्या. त्यांची छोटी छोटी रोपे तयार झाल्यानंतर ती रोपे महाविद्यालय  परिसराच्या अवतीभोवती लावण्यात आली. तसेच आपट्याची पाने फुले फांद्या न तोडता टाकाऊ कागदापासून आपट्याच्या पानाचे आकार तयार केले व त्यावर पर्यावरण पूरक संदेश विद्यार्थ्यांनी लिहिले. 


 

 या उपक्रमाविषयी बोलताना प्राचार्य  डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, पर्यावरण पूरक दसऱ्याचा हा उपक्रम महाविद्यालयाचा विशेष उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक रक्षणाचा वसा घ्यावा व झाडांचे संरक्षण करावे. सिमेंटच्या जंगलाऐवजी झाडांची जंगले वाढवण्याचा प्रयत्न करावा. मानवी जीवनासाठी हे अत्यंत गरजेचे आहे.पर्यावरणाचा होणारा  ऱ्हास यामुळे थांबवण्यास मदत होईल. 
  स्वागत व प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. ए.व्ही.मगदूम पाटील यांनी केले. रोहित पाटील  रसिका गंडमाळे या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाविषयी मनोगते व्यक्त केली.प्रा कु.एस.बी.चव्हाण यांनी आभार मानले. महाविद्यालयाचे प्रबंधक मनीष भोसले, डॉ. आर. डी. मांडणीकर प्रा. सौ. पी. एस. कुलकर्णी, प्रा. सौ. दीपा पाटील, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 


   

संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले. वनस्पतीशास्त्र विभागातील 66 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग. नोंदवला.


शहाजी महाविद्यालयात पर्यावरण पूरक दसरा संपन्न